New Delhi : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर एनडीए सरकार सत्तारूढ झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांनाही शपथ देण्यात आली. मोदींसह 58 मंत्र्यांनी शपथ घेतली. सरकारमध्ये मोदींसह 72 मंत्री असतील. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार मंत्री आहेत. 36 राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे.
राष्ट्रपती भवनातील या सोहळ्याला 7 देशांच्या नेत्यांशिवाय देशातील सिनेतारकांनीही हजेरी लावली. यात अक्षय कुमार, शाहरुख खान, विक्रांत मेस्सी आणि राजकुमार हिरानी यांचा समावेश होता. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे देखील शपथविधी सोहळ्यात होते. रजनीकांतही शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले होते. नव्या मंत्रिमंडळात 27 ओबीसी मंत्री आहेत. 10 अनुसूचित जातीचे (SC) मंत्री आहेत. 5 मंत्री अनुसूचित जमातीचे (ST) आहेत. पाच अल्पसंख्यांक मंत्र्यांचाही समावेश मंत्रिमंडळात आहे.
असे आहे वाप
एडीच्या मित्रपक्षांना 11 मंत्रिपदं देण्यात आली आहेत. मंत्रिमंडळात 43 मंत्री असे आहेत जे तीनदा किंवा अधिक वेळा विजयी झाले आहेत. 39 खासदार आधीही मंत्री होते. मंत्रिमंडळापैकी 23 जण असे आहेत जे वेगवेगळ्या राज्यमंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. 34 मंत्री असे आहेत ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये आमदार आहेत. शिवराज सिंह चौहान आणि मनोहर लाल खट्टर यांना पहिल्यांदाच मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
दोघांनाही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. जेडीएसचे खासदार एच.डी. कुमारस्वामी, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (एचयूएम) जितन राम मांझी आणि जेडीयूचे राजीव रंजन सिंग (ललन सिंग) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्याचवेळी सर्वांत तरुण टीडीपी खासदार राममोहन नायडू देखील मंत्री झाले आहेत.
PM Oath Ceremony : ‘माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा’
नड्डा यांच्याकडे भोजन
शपथविधी सोहळ्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या घरी एनडीएतील सर्व नेत्यांसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. स्नेहभोजनाचा मेन्यू देखील खास आहे. यामध्ये सरबत, मिल्कशेक, स्टफ्ड लिची, मटका कुल्फी, आंबे, तीन वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीरसह इतर व्यंजनांचा समावेश आहे. जोधपुरी भाजी, डाळ, दम बिर्यानी आणि पाच प्रकारच्या पोळ्या (चपात्या/रोट्या) आहे. पंजाबी व्यंजनांचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
बाजरीची खिचडी आणि इतर अनेक प्रकारचे सरबत उपलब्ध करण्यात आले आहेत. मिष्ठान्न आवडतं अशा लोकांसाठी आठ वेगवेगळ्या गोड पदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. रसमलाई, चार प्रकारचे घेवर, चहा आणि कॉफी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. नड्डा हे सध्या भाजप अध्यक्ष असून त्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे.