देश / विदेश

PM Oath Ceremony : नरेंद्र मोदी यांनी केली विक्रमाची बरोबरी

Narendra Modi : प्रचंड घोषणाबाजीत घेतली पंतप्रधानपदाची शपथ

PM Oath Ceremony : नरेंद्र मोदी यांनी केली विक्रमाची बरोबरी

Narendra Modi : प्रचंड घोषणाबाजीत घेतली पंतप्रधानपदाची शपथ

narendra modi took oath as prime minister of india third time pj81 mc97

New Delhi : केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांची सत्ता आली आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू होती. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. परदेशातील मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित होते.

तिसऱ्यांदा शपथ घेण्याचा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची त्यांनी बरोबरी केली आहे. पंतप्रधान मोदी हे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करतील, असे सांगण्यात येत होते. नरेंद्र मोदी सलग तीनदा पंतप्रधानपदावर आले एकमेव गैरकाँग्रेसी पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यावेळी प्रचंड घोषणाबाजी झाली. शपथविधी समारंभात नरेंद्र मोदी यांनी हिंदीतून शपथ घेतली. पांढरा कुर्ता-पायजामा आणि निळा कोट असा त्यांचा वेश होता.

मोदी मोदीच्या घोषणा

भारतीय राज्यघटनेशी खरी निष्ठा ठेवेल अशी शपथ त्यांनी घेतली. त्यांनी आपले नाच उच्चारताच उपस्थितानी मोदी..मोदीच्या घोषणा दिल्या. मोदी यांनी शपथ घेताच पंडित जवाहरलाल नेहरूंच्या 62 वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबरी केली.1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. परंतु 1951-52 मधील पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय संविधानानुसार प्रथमच पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर पंडित नेहरूंनी 1957 मध्ये दुसऱ्यांदा आणि 1962 मध्ये तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 17 वर्षांच्या कार्यकाळात ते सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान राहिले. मोदी यांनी सलग तीनदा शपथ घेतली आहे.

राजघाटावर दर्शन

राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर जाऊन आदरांजली वाहिली. मोदींनी युद्ध स्मारकावर जाऊन देशासाठी बलिदान दिलेल्या शूर सुपुत्रांना सन्मान दिला.

Modi 3.0 : मंत्रिपदाबद्दल दादांचा गट अजूनही आशावादी

2024 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपचे पूर्ण बहुमत हुकले. एनडीएने एकूण 293 जागा मिळवून 272 जागांचा (बहुमत) आकडा गाठला आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. रविवारी त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि विक्रम स्थापित केला.

error: Content is protected !!