PM Narendra Modi Oath Ceremony : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रणित एनडीएने (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) बहुमत मिळवलं असून नरेंद्र मोदी 9 जुन रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर 30 खासदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राला कोणती खाती मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी देशभरातील अनेक खासदारांना फोन गेल्याची बातमी समोर आली आहे.
नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन इतिहास रचणार आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतरचे ते दुसरे नेते आहेत, जे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत आहेत. शपथविधी सोहळ्यानिमित्त दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला परदेशातील अनेक पाहुणे मंडळीही उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळाचा समावेश करण्यात आलेल्या खासदारांना पीएम कार्यलयातून फोन हि गेले असून, सर्वच संभाव्य मंत्री दिल्लीत तहान मांडून आहेत.
हे नेते बनणार मंत्री
मनसुखभाई मांडविया,राव इंद्रजीत सिंह, किरण रिजिजू, अश्विनी वैष्णव,रामदास आठवले, रक्षा खडसे, अनुप्रिया पटेल,कमलजीत सेहरावत ,मुरलीधर मोहोळ,शंतनू ठाकूर,अन्नामलाई, मनोहर लाल खट्टर ,प्रतापराव जाधव, पियुष गोयल, ज्योतिरादित्य,एचडी कुमारस्वामी, जितेंद्र सिंह,सर्वानंद सोनोवाल, नितीन गडकरी, चिराग पासवान,अर्जुन मेघवाल, जयंत चौधरी,राम मोहन नायडू, चंद्रशेखर पेम्मासानी, जीतनराम मांझी, रामनाथ ठाकूर यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे निश्चित मानले जात आहे.
राज्यातून यांना मंत्रिपद मिळणार?
महाराष्ट्रातून नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ, शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, अजित पवार गटाचे प्रफुल पटेल मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचे निश्चित झाले असले तरी यापैकी प्रफुल्ल पटेलांना अजून पीएम कार्यालयातून फोन आलेला नाही. पुण्याचे माजी महापौर आणि पहिल्यांदाच खासदार बनलेल्या मुरलीधर मोहोळ यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुरलीधर मोहोळ यांना पीएमओकडून कॉल आला असल्याची माहिती आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांच्या नावावर देखील शिक्कमोर्तब झाले आहे.
अजित पवार गटाला मंत्रिपद नाही ?
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला धक्का बसला आहे. महाराष्ट्रात अजित पवार गटाची केवळ एकच जागा आली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळणार नसल्याची माहिती आहे. केंद्रात दोन मंत्रिपद मिळावे अशी मागणी अजित पवार गटाने केली होती. पण त्यांना एकही मंत्रिपद देण्यात येणार नसल्याचे दिसून येत आहे. सकाळ पासून प्रफुल पटेल यांच्या नावाची चर्चा होती. मात्र अद्यापपर्यंत पीएम कार्यलयातून त्यांना कॉल आलेला नाही.