Nana Patole : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी मंगळवारी (ता. 4) झाली. त्यात काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे 37 हजार 380 मतांनी विजयी झाले. तुमसर विधानसभेत त्यांना 9016 मतांची आघाडी मिळाली. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात तुमसर विधानसभेत डॉक्टर पडोळे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
तुमसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार असताना 9 हजारांची लीड काँग्रेसला मिळाली. येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मायक्रो प्लॅनींग केल्यानेच हे यश मिळाले आहे. तुमसर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत.त्यामुळे या मतदारसंघातून अधिकाधिक मते कशी प्राप्त करता येतील, याची मायक्रो प्लॅनिंग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दोन महिन्यांपूर्वीच केली होती.
संपर्क होता म्हणून विजय हाती..
विकास फाऊंडेशनचे संस्थापक माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नाना पटोले संपर्कात होते. काँग्रेसचे माजी आमदार अनिल बावनकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी खासदार मधुकर कुकडे यांची त्यांनी मोट बांधली. ते येथे काँग्रेसला मताधिक्य मिळवून देण्यात किंग मेकर ठरले.
त्यांच्या परिणाम म्हणून डॉ. प्रशांत पडोळे यांना तुमसरमध्ये एकूण 1 लाख 220 मते मिळाली, तर भाजपचे सुनील मेंढे यांना 91 हजार 204 मते मिळाली. यात डॉ. पडोळे यांना 9016 मतांची लीड मिळाली. लोकसभा मतदारसंघात डॉ. प्रशांत पडोळे यांच्या मतांची टक्केवारी 47.95, तर सुनील मेंढे यांच्या मतांची टक्केवारी 44.40 इतकी आहे.
India Alliance : नानांनी न बोलता दाखवून दिलं ‘मोठा भाऊ’ कोण?
काँग्रेसने येथे जातीय समीकरणांवर अधिक लक्ष दिले. काँग्रेस व भाजपचे उमेदवार हे कुणबी आहेत. त्यामुळे त्यांच्यात कुणबी मतदारांची वाटणी होणार हे काँग्रेसने गृहीत धरले. त्यामुळे तेली व कुणबी मतदारांवर काँग्रेसने अधिक फोकस केले होते. त्यात माजी आमदार चरण वाघमारे व अनिल बावनकर यांनी येथे आपल्या परीने विशेष प्रयत्न केले. पोवार मतदारांची संख्या या मतदारसंघात लक्षणीय आहे.याचा परिणाम काँग्रेसच्या विजयात पहायला मिळत आहे.