Nana Patole : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यात आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. आरोप होत असलेल्या ‘डमी’ उमेदवाराला त्यांनी हिरो बनवून दाखविले आहे. काँग्रेसचे नवखे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांचा पराभव केला आहे. 25 वर्षांनी का होईना नाना पटोले यांना मोठे यश आले आहे.
पटोले यांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात आपले निर्विवाद वर्चस्व स्थापन करून दाखविले आहे. इतकेच नव्हे तर पटोले यांना भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील मतदारांनी साथही दिली आहे. नाना पटोले यांनी स्वतःला मोठा भाऊ म्हणून घेणाऱ्या खासदार प्रफुल्ल पटेल यांचे गर्वहरण केले आहे. आपल्या शिवाय भंडारा-गोंदियाची सत्ता काबीज करता येणे शक्य नाही. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे अमित शहा यांच्या सभेत हे वक्तव्य होते. ते विजय खेचुन आणत पटोले यांनी खोडून काढलले आहे.
तटस्थ भूमिका?
भाजपचे पराभूत उमेदवार सुनील मेंढे यांना मिळालेली मते केवळ भाजपची असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भंडारा-गोंदियातील अजित पवार गट मतदानावेळी तटस्थ राहिला का? असा संशय भाजपकडून घेतला जात आहे. भंडारा-गोंदियातील भाजप अनेक गटात विखुरली आहे. अनेक जण नेते गटात आहेत. त्यांचा आपसी ताळमेळ नसणे हे सुनील मेंढे यांच्या पराभवाचे कारण ठरले आहे.
Rahul Gandhi : ‘इंडीया’ विरोधात बसणार की सत्ता स्थापन करणार? उद्या फैसला !
पवार गटाचे काय?
भाजपला अजित पवार गटावर विश्वास करणे भोवल्याचे बोलले जात आहे. किंबहुना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार गटाचे नेते कमवुत पडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपने आपल्या मित्र पक्षावर चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. तूर्तास भंडारा-गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसने मिळवलेला विजय भाजप नेत्यांच्या पचनी पडेल असे वाटत नाही.
नाना यांची नाना
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ नाना पटोले यांचा गृह मतदारसंघ मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत नाना पटोले भंडारामधून निवडणूक लढतील असे वाटत होते. परंतु त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यामुळे नाना पटोले यांनी डमी उमेदवार उभा केल्याची चर्चा होती. आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विदर्भात काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळाल्याने नाना पटोले यांचे वजन काँग्रेसमध्ये निश्चितच वाढणार आहे. असे असले तरी पटोले हे भाजपचे टेन्शन नसून मित्र पक्षांची साथ चिंतेची बाब आहे.