महाराष्ट्र

Bhandara Gondia : उत्कंठा शिगेला ! कोणाला पोचपावती, कोण देईल गिफ्ट?

Lok Sabha Result : विजयाच्या समिकरणावर मतदारसंघात चर्चा 

Election News : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारला होत आहे. 19 एप्रिलला मतदान झाल्यापासून कोण निवडून येईल, हिच चर्चा सुरू होती. विजयाचे समिकरण सांगण्यापासून तर्क लावणेही सुरू आहे. याच अंदाजाने कोट्यवधीच्या पैजही लागल्या. आता मतमोजणीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत भाजप महायुतीचे सुनिल मेंढे, काँग्रेस महाआघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे, बसपाचे संजय कुंभलकर, वंचितचे संजय केवट, अपक्ष सेवक वाघाये यांच्यासह 18 उमेदवार रिंगणात होते.

निवडणुकीत थेट लढत सुनिल मेंढे विरूद्ध डॉ. प्रशांत पडोळे यांच्यात झाली. बसपा, वंचित व वाघाये किती मते घेतात आणि कोण कुणाच्या मतांचे गणित बिघडविते हे निकालाअंती कळेलच. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे सुनिल मेंढे हे विद्यमान खासदार आहेत. मतमोजणीअंती निवडून आल्यास ते दुसऱ्यादा संसदेत पोहोचतील.

फ्लॅशबॅक बघा 

2019 मधील निवडणुकीत 6 लाख 50 हजार 243 मते घेऊन 1 लाख 97 हजार 394 मतांनी सुनिल मेंढे विजयी झाले होते. यावेळी त्यांच्यासमोर काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे हा नवखा उमेदवार आहे. डॉ. पडोळे यांचे सर्वपक्षात संबंध आहेत. काँग्रेसचे पाठबळ असल्यामुळे निवडणुकीत त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा होती. त्यामुळे विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे लवकरच कळणारच आहे. दोन्ही उमेदवारांकडून आपलाच विजय पक्का असल्याचे सांगण्यात येत आहे.

Yavatmal Constituency : याला म्हणतात ‘कॉन्फिडन्स’, निकालापूर्वीच विजयाचे बॅनर

दृढ विश्वास

भाजप उमेदवार सुनील मेंढे यांना आपण केलेल्या विकास कामाची पोचपावती म्हणून विजय मिळणार असल्याच्या दृढ विश्वास आहे. काँग्रेस उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी तर आपण विजय मिळवून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विजयाचे गिफ्ट देणार असल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे नेमका गुलाल कोण उधळनार हे कळणार आहे.

भंडारा-गोंदिया हा प्रफुल पटेल आणि नाना पटोले ह्या दोन्ही मातब्बर नेत्यांचा मतदारसंघ आहे. नाना पटोले यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी मिळाली. मतदारसंघात तब्बल 25 वर्षानंतर निवडणुकीत पहिल्यांदा इव्हीएम मशीनवर पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळाले. कधीकाळी भंडारा-गोंदिया काँग्रेसचा गड होता. नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजपचे वर्चस्व राहिले. काँग्रेस आणि भाजपने या मतदारसंघात मतदारांना साद घालण्याची कुठलीच कसर सोडली नाही. आता मतदारराजा नेमका कुणाला आणि कुठल्या मुद्द्यावरून आपला कौल देतो हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!