Maharashtra Politics : नरेंद्र मोदींचा करीश्मा उतरला आहे. तुलनेत राहुल गांधी यांनी जी भूमिका जनतेसमोर मांडली, पदयात्रा केली यादरम्यान जनतेचा आवाज काँग्रेससोबत होता. लोकांचा प्रतिसाद होता. मोठया प्रमाणात देशाने समर्थन केले आहे. ते निकालातून दिसेल. त्यामुळे 4 जूननंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट राहील की नाही, याची शंका वाटते, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
आज (ता. 1) नाना पटोले नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त आणि इंडिया आघाडीत आम्हाला 300 पेक्षाही जास्त जागा मिळतील, असा विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याबाबत विचारले असता, तटकरे कुठले आहेत? मला त्यावर चर्चा करायची नाही. महाराष्ट्रात दुष्काळ आहे. पिण्याचे पाणी नाही. शेती पीक नष्ट झाले आहे. आज शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सत्तेतील लोकांना का दिसत नाहीत?
पटोलेंचा सरकारवर निशाणा
माणसालाही प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, याची काळजी सत्तेतील कुणालाही नाही. त्याला फार महत्व देण्यासारखं कुणालाच काही वाटत नाही. दुधाचा भाव घसरला आहे, दुधातून व्हिटॅमिन मिळत नाही. पण सरकारचे याकडे लक्ष आहे कुठे? अजित पवार पुणे प्रकरणावर बोलताना, जे लोक भांबावले आहेत, ते त्यांच्याबद्दल काय बोलणार, असा प्रतिप्रश्न करीत राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याने सत्ताधाऱ्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे पटोले म्हणाले.
Lok Sabha Election : मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींचा खास संदेश !
पुण्यासारखीच एक घटना नागपूरातसुद्धा घडली, जळगावमध्ये त्यापेक्षा मोठी घटना घडली. या सरकारजवळ गर्भश्रीमंत लोकांसाठी वेगळा न्याय आणि गरीबांसाठी वेगळा न्याय आहे. राज्यात दुष्काळाती स्थिती असताना मुख्यमंत्री सुट्टीवर गेले आहेत. जनतेचा जीव सुरक्षित नाही, या सरकारमधील लोकांवर सोशल मिडियातून प्रचंड टिका केली जात आहे. या गर्भश्रीमंत लोकांकडून अपघातानंतर निबंध लिहून घेतला जातो, याला काय म्हणावे ?
राज्यातील लोक भयभीत आहेत. प्रशासन कोणाचं ऐकत नाही. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे, पण ते सुटीवर गेले आहेत. सत्तेतील नेते आज एक उद्या एक बोलतात, असा आरोप पटोले यांनी केला. पुणे हिट अॅन्ड रन प्रकरणातील अग्रवाल बिल्डर आहेत. त्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत. योग्य वेळी खुलासे करू. या प्रकरणात कुणाचा सहभाग आहे, हे योग्य वेळी मांडू. त्यामुले सरकारने आता लपावाछपवी करू नये, असेही पटोले म्हणाले.