महाराष्ट्र

Gas Pipeline Issue : शेतकरी कुटुंबाने मागितली आत्मदहनाची परवानगी 

Land Acquire : भूमिहीन होण्याची भीती

Gondia District : गॅस पाईप लाईनच्या सब स्टेशनसाठी तिरोडा तालुक्यातील पालडोंगरी येथील गेंदलाल सोमा बोपचे यांच्या कुटूंबाची जमीन निवडण्यात आली आहे. मात्र अधिग्रहणानंतर शेतकरी भुमिहीन होणार आहे. त्याच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे जमीन देण्यास नकार दिला. मात्र, अधिकारी, कर्मचारी दमदाटी करीत आहे. या प्रकाराला कंटाळून पिडित शेतकऱ्याने गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांकडे सामूहिक आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

भूमिगत गॅस पाईपलाईन योजनेचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. गॅस पाईप लाईनच्या सबस्टेशनसाठी गॅस कंपनी व प्रशासनाकडून पालडोंगरी येथील शेतकरी सोमा बोपचे यांची शेत जमीन निश्चित करण्यात आली. ज्या शेतकऱ्याची जमीन अधिग्रहित करायची आहे. त्या शेतकऱ्याकडे दुसरी कुठलीही जमीन नाही. त्या शेत जमिनीवर बोपचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. ती जमीन अधिग्रहित झाली तर शेतकऱ्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

Malkapur APMC : भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर! 

म्हणून शेतकरी कुटुंबाचा विरोध

त्यामुळे शेतकरी सोमा बोपचे व सिंधू बोपचे यांनी अधिग्रहणास विरोध दर्शविला. मागील दोन वर्षांपासून जमीन अधिग्रहणाचा प्रश्न रखडलेला असल्याने संबधित कंपनी व काही अधिकारी त्या शेतकऱ्यावर दडपण आणत आहेत. दररोज एक ना एक अधिकारी शेतकऱ्याची भेट घेवून दमदाटी व पोलिसांची धमकी देत आहेत. एवढेच नव्हे तर सदर जमिन द्यायची इच्छा असेल अथवा नसेल तरीही अधिग्रहित होणारच, असा दम देत आहेत. या प्रकाराला कंटाळून शेतकरी गेंदलाल सोमा बोपचे व सिंधू सोमा बोपचे यांनी जिल्हाधिकाऱ्याला पत्र लिहून सामूहिक आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. आता जिल्हाधिकारी या प्रकरणाकडे लक्ष घालून शेतकऱ्याला न्याय देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!