Political War : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साध ला आहे. मोदींचा ‘घोंचू’ असा उल्लेख करीत चित्रपटातील एक व्हिडिओ पोस्ट केली. मोदी हे उत्कृष्ट अभिनेते आहेत. मला आश्चर्य वाटते की, त्यांना यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन का मिळाले नाही. अशी खोचक टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
लोकसभा निवडणूक ही शेवटच्या टप्प्यावर आली आहे. देशात पुढे काय काय घडणार, हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांवर सुरूच आहेत. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यानधारणेला बसले आहेत. तामिळनाडूमध्ये त्यांनी ध्यानधारणा सुरू केली आहे. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. मोदींच्या ध्यानधारणेचे लाइव्ह टेलिकास्ट करण्यापासून रोखण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसने केलेली आहे. काँग्रेसच्या या आक्षेपानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही मोदींवर टीका केली आहे.
Yavatmal News: पी.के. कन्स्ट्रक्शनच्या कारनाम्याने झाली ‘पी के.’ चित्रपटाची आठवण
गेल्या काही दिवसांपासून ॲड.प्रकाश आंबेडकर हे ‘घोंचू’ या शब्दाचा उल्लेख करत ट्विटरच्या माध्यातून नरेंद्र मोदींवर टीका करीत आहेत. इंडिया आघाडीनेही त्यांना एकत्रितपणे ‘घोंचू’ म्हणावे असा सल्लाही त्यांनी पूर्वी दिला होता.
नेमकं काय म्हणाले आंबेडकर!
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा ट्विटर च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदींना कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये नामांकन का नाही ? असा सवाल केला. काही दिवसांपूर्वी मोदींनी स्वत:ची तुलना देवासोबत केली होती. जर ते खरोखरच देव असतील, तर ते कोणाशी जोडण्यासाठी ध्यान करत आहेत ? हाही प्रश्न आहे असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.