महाराष्ट्र

BJP on Awhad : खामगावात आव्हाडांचे फोटो या आमदाराने पायदळी तुडविले !

Aggressive : भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक 

BJP News : खामगावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यालयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला. मुर्दाबाद, मुर्दाबाद जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, जितेंद्र आव्हाड यांचे करायचे काय, खाली डोक वरती पाय अशा जोरदार घोषणा दिल्या. आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडविण्यात आले. 

महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा अवमान केल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजप आणि आरपीआय आज आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलने करत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आव्हाड यांचे फोटो यावेळी पायदळी तुडवले

जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करा. निवडणूक प्रचारात संविधान बचाव च्या घोषणा देणाऱ्यांनीच संविधान निर्मात्यांचा घोर अपमान केला व आपली विकृत प्रवृत्ती महाराष्ट्रासमोर मांडली. अशा प्रवृत्तीला आळा घालण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार आकाश फुंडकर यांनी दिली.

Amol Mitkari : वडेट्टीवार यांच्या बुद्धीची येते ‘कीव’

ही आव्हाडांची नेहमीची सवय

जनतेला मूर्ख बनवत केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करायचा ही जितेंद्र आव्हाड यांची नेहमीचीच सवय आहे. परंतु यापुढे आता हे सहन करण्यात येणार नाही. आव्हाड यांनी दलित समाज व सर्व महाराष्ट्राची माफी मागावी, आपल्या सर्व पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा भाजपाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आमदार आकाश फुंडकर यांनी दिला.

भाजपचे तीव्र आंदोलन

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलनात भाजपा जिल्हा महामंत्री शरदचंद्र गायकी, खामगाव विधानसभा विस्तारक डॉ. एकनाथ पाटील, जिल्हा सचिव राजेंद्र धनोकार, तालुकाध्यक्ष विलास काळे, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सचिव राम मिश्रा ,भाजयुमो खामगाव विधानसभा प्रमुख पवन गरड, तालुका अध्यक्ष राज टिकार, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख, अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष राजेश तेलंग, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. महेश आखरे,गणेश सोनोने,अनिस जमादार, अशोक हट्टेल, युवराज मोरे, वैभव डवरे, जिल्हा कार्यकारणी सदस्य छगन राठोड, रमेश इंगळे, प्रसाद यदलाबादकर, गोलू आळशी, आकाश बडासे, अनिल मेतकर, विक्की हट्टेल, आशिष सुरेखा, अभिलाष मु-हे, श्रीकांत जोशी, पांडुरंग गायकवाड, रोहन जयस्वाल, पवन ठाकूर, राजेंद्र राजपूत, निखिल घाडगे, भागवत वनारे, भागवत वाघ, संतोष येवले, नंदू कांडेकर, संतोष गुरव, रवी गायगोळ, निकुंज मंदानी, बंटी खंडेलवाल, गणेश लाहुडकार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!