Jitendra Awhad : नाशिकच्या चवदार तळ्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केले. आंदोलनाच्या वेळी आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले. या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आव्हाड यांनी असे कृत्य करण्याला प्रोत्साहन दिले आहे. यावरुन आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या कृत्यामुळे आम्ही त्यांना धडा शिकवू, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
काय म्हणाले बावनकुळे
डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी स्टंटबाजीच्या नादात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. आव्हाड यांनी थोर महापुरुषाचा अपमान केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असलेले पोस्टर्स आधी आव्हाड यांनी छापले आणि मग ते फाडले. स्वतःच्या विकृत आणि भ्रमिष्ट मानसिकतेचं प्रदर्शन जितेंद्र आव्हाड यांनी केल आहे. जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी दिनांक 30 मे रोजी राज्यभरात आंदोलन करणार. भारतातील महामानवांचा अपमान खपवून घेणार नाही. आव्हाड यांनी केलेल्या या विकृत कार्यामुळे भाजपा त्यांना धडा शिकविणार. असे भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे अटकेची मागणी
महाड येथे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्यांचा अवमान करणार्या जितेंद्र आव्हाडांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करावी. अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्यामार्फत मिळाली आहे. जितेंद्र आव्हाड हे नकलाकार, नाटककार आणि नौटंकीबाज आहेत. आज त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले. त्यामुळे त्यांच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं आहे.
नागरिकांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रातील नागरिकांमधून देखील जितेंद्र आव्हाड यांना शिक्षा मिळावी अशी मागणी होत आहे. आव्हाडांना कदाचित शासन निर्णयाची पूर्णपणे माहिती नसावी. म्हणून अशा प्रकारचे पाऊल आव्हाड उचलत आहेत. ते पाऊल फक्त प्रसिद्धीसाठी उचललेल्या जात आहेत. आव्हाड महाडला जाऊन मनुस्मृतीची होळी करत आहेत. कारण, बरेच दिवस झाले प्रचारामध्ये पक्षाकडून आव्हाडांना कुठेच सहभागी करून घेतल नव्हत. म्हणून, ही प्रसिद्धीची संधी सुटू नये. यासाठी जितेंद्र आव्हाड मनुस्मृति दहन करीत आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्या धनाला काहीही अर्थ नाही. असे जनमाणसातून बोलल्या जात आहे.