Political Drama : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक येथील चवदार तळ्यावर आंदोलन केले. आव्हाड यांनी येथे मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेल्याचा आरोप आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला आहे. आव्हाड यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली. त्यानंतर आता नागपूरमधूनही संताप व्यक्त झाला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी आव्हाड स्टंटबाज असल्याचे म्हटले आहे.
स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये असा संताप पवार यांनी व्यक्त केला. आव्हाड यांनी थोर महापुरुषाचा अपमान केला आहे, असे पवार म्हणाले. या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आव्हाड यांनी असे कृत्य करण्याला प्रोत्साहन दिले. शरद पवार पुरोगामी विचार रुजवितात. त्याच पक्षाचे आमदार बाबासाहेब यांचा फोटो फाडतात. ही कृती अयोग्य आहे. असा प्रकार लज्जास्पद आहे, असे पवार म्हणाले.
Akola Agriculture : ‘द लोकहीत इम्पॅक्ट’, वाढीव दरात बियाणे विकणाऱ्यावर कारवाई !
फुकट प्रसिद्धी
जितेंद्र आव्हाड हे फुकट प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतात. त्यांची अवस्था आता केविलवाणी झाली आहे. त्यांना पक्षात कोणी विचारत नाही. त्यामुळे मनुस्मृती जाळण्याचे नाटक त्यांनी केले. शरद पवार यांच्यापेक्षाही आपण मोठे असल्याचे दाखविण्याचा हा प्रकार आहे. लवकरच निवडणूक होणार आहे. त्यामुळे असे स्टंट ते करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहित पवार वरचढ आहेत. त्यामुळे आघाडी यांना कोणी विचारत नाही. आपले भाव वाढवून घेण्यासाठी आव्हाड असे आंदोलन करत राहतात, अशी टीका प्रशांत पवार यांनी केली.
लोक हसतात
स्टंटबाज आंदोलनामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावर लोक हसतात. आता तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा आवमान केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले. शरद पवार यांनी आमदार आव्हाड यांना तातडीने पक्षातून काढावे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी असेही पवार यांनी म्हटले आहे.
जोकरपैकी एक
महाराष्ट्रातील जनतेची काही जोकर करमणूक करतात. राजकारणात असे काही जोकर आहेत. या जोकर पैकी आमदार जितेंद्र आव्हाड हे एक आहेत. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांची राजीनाम्याची मागणी करू नये. जितेंद्र आव्हाड हे केवळ आमदार आहेत. त्यांना अजित पवार यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही प्रशांत पवार म्हणाले.