Congress News काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची हिमाचल प्रदेशातील हमीरपूर लोकसभा मतदारसंघातील गागरेट येथे निवडणूक प्रचार सभा झाली. प्रियंका गांधी यांनी त्यांच्या जाहीर सभेत माजी पंतप्रधान आणि आजी इंदिरा गांधींचा उल्लेख केला. इंदिरा गांधींच्या राजवटीचा उल्लेख करत त्यांनी सरकारवरही निशाणा साधला. इंदिराजींच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना भरून आले.
प्रियांका गांधी यांनी पत्राचा उल्लेख केला
इंदिरा गांधींचा उल्लेख करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘इंदिरा गांधीजी पंतप्रधान असताना त्या आपल्या लोकसभा मतदारसंघात गावोगावी पायी जात होत्या आणि लोकांच्या तक्रारी ऐकत होत्या. काही लोक इंदिरा गांधींना टोमणे मारायचे, त्या ऐकायच्या. ‘जेव्हा ती शहीद झाली तेव्हा माझ्या वडिलांना त्यांच्या खोलीत एक पत्र सापडले. त्यावर लिहिले होते की, मला काहीही झाले तर माझ्या अंत्यसंस्कारा नंतर माझी अर्धी राख अलाहाबादच्या संगमात आणि अर्धी हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये टाकावी. कारण मला हिमालयाच्या बर्फात विरघळायचे आहे. हा किस्सा सांगून त्यांचे डोळे पाणावले.
Nana Patole : पुणे प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न
सरकारवर आरोप करताना प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘एक विचारधारा होती की हा देश माझा आहे, ही माझ्या देशाची भूमी आहे, मला या देशाच्या भूमीत विसर्जित करा आणि दुसरी विचारधारा अशी की सरकारे देशातील जनता निवडून देते आणि तुम्ही शेकडो कोटींना आमदार विकत घेऊन जनतेने निवडून दिलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहात. गलिच्छ राजकारण झाले आहे.
लोकप्रतिनिधींना विकत घेणा-यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन प्रियंका गांधींनी केले. काँग्रेसचे स्थानिक नेते सभेला उपस्थित होते.