देश / विदेश

Subodh Saoji : माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

Threat : निवडणूक आयुक्तांना दिली होती ठार मारण्याची धमकी !

EVM issue : माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त, दिल्ली यांना पत्र पाठवून ईवीएम मशीन मध्ये घोटाळा झाला तर मी तुमचा खून करेल, अशी धमकी पत्राद्वारे दिली होती. यामुळे खळबळ उडाली. शुक्रवारी डोणगाव पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

काय होती धमकी

निवडणूक आयोगाने जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला तर मी त्यांचा मर्डर करेल, अशी धमकी माजी महसूल राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिली होती. सावजी हे नुसती धमकी देऊन थांबले नाही तर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना धमकीचे पत्र पाठवले होते. या पत्रामुळे पोलिस, प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुबोध सावजी यांच्यावर डोणगाव येथील पोलिस स्टेशन मध्ये कलम 506 अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

काय होत प्रकरण ?

देशभरात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत. अशी स्थिती असताना निवडणूक आयोगाने जर ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा केला तर आपण त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ‘राज्यातील सर्व मतदारांच्या वतीने मी आपला मर्डर करेल’ अशी थेट धमकी सुबोध सावजी यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तांना दिली आहे. त्या संदर्भातील पत्र त्यांच्या दिल्ली कार्यालयाला पाठवले होते.

“माझ्या डोळ्यादेखत महाराष्ट्रातील करोडो मतदारांनी लोकशाही पद्धतीने वापरलेल्या अधिकाराचा आपण उघड-उघड खून करणार असाल, तर मी या मतदारांच्या हक्काच्या सन्मानार्थ आपला खून करण्यास मागे पुढे पाहणार नाही. आणि लोकशाहीच्या इतिहासात मी माझे नाव अजरामर करेन”, असे सावजी यांनी पत्रात नमूद केले आहे.

Lok Sabha Election : देशात सहाव्या टप्प्यात 889 उमेदवारांचे भवितव्य पणाला

हटके आंदोलनासाठी प्रसिद्ध 

आपल्या हटके आंदोलनांमुळे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांसाठी सुबोध सावजी प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी संभाजी भिडे गुरुजी, जिल्हा परिषदेतील अधिकारी यांना मर्डरची धमकी दिली होती. तर राम कदम यांची जीभ छाटून आणणाऱ्यास 5 लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. आता त्यांनी थेट निवडणूक आयक्तांनाच धमकी दिली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!