Mlc Election राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर,तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 26 जूनला 4 जागांसाठी मतदान होणार आहे तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.
मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या चार जागांसाठी मतदान होणार आहे.राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.त्यानंतर निवडणूक आयोगाने शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
महायुती महाविकास आघाडी आमने-सामने
विधानपरिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने येणार आहे.
31 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे. शेवटची मुदत 7 जून ठेवण्यात आली आहे. अर्जाची छाननी 10 जून, अर्ज माघारी घेण्यासाठी 12 जून आणि मतदान 26 जून रोजी घेतले जाणार आहे. तर मतमोजणी 1 जुलै 2024 रोजी घेतली जाणार आहे.
रद्द झाली होती निवडणूक
विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर विविध शिक्षक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तर शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्यासोबत दिल्लीत जाऊन भारतीय निवडणूक आयोगाकडे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने अनिश्चित काळासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पुन्हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
Patole on Jarange : जरांगे आणि सरकारच्या भानगडीत आम्हाला पडायचे नाही !
शिक्षण संघटनांचा विरोध
राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी असल्याने मतदानावर परिणाम होईल, असे शिक्षक संघटनांचे म्हणणे होते. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली. शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने याबाबत विचार करुन निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय होता. दरम्यानचा आज नव्याने कार्यक्रम जाहिर झाला.26 जूनला 4 जागांसाठी मतदान होणार आहे तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.