देश / विदेश

Bangladesh MP : खासदाराच्या मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या कसायाला अटक

Brutally Murdered : हनीट्रॅप लावून आणले भारतात

Bangladesh News : भारत दौऱ्यावर आलेले बांगलादेशी खासदार मोहम्मद अन्वारुल अझीम यांच्या हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल सीआयडीने जिहाद हवालदार नावाच्या व्यक्तीला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिहाद हा व्यावसायिक कसाई आहे. खुनाचा सूत्रधार अक्तारुझमान याने जिहादला मुंबईहून बोलावलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी जिहादला या कामासाठी नियुक्त करून मुंबईहून कोलकाता येथे बोलावण्यात आलं होतं. पाच कोटी रुपयांच्या सुपारीतील काही हिस्सा जिहादला देण्यात आला होता. कोलकाता विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये तो थांबला होता. खुनाचा सूत्रधार अक्तारुझमान हा अमेरिकन नागरिक आहे.

खासदार मो. अन्वारुल अझीम यांची कोलकाता येथे निर्घृण हत्या झाल्याचा दावा बांगलादेशने केला होता. अझीम हे बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लिगचे खासदार होते. त्यांचा खून झाल्याचा दावा करण्यात आल्यानंतर कोलकाता सीआयडी आणि बांगलादेश पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणी अझीम यांच्या बालपणीच्या मित्रावर पोलिसांचा संशय होता. मात्र, आता या प्रकरणातील हनीट्रॅप अँगलही समोर येत आहे.

अझीम यांच्या मृतदेहाची विटंबना

अझीम यांच्या मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या कसायालाही अटक करण्यात आली आहे. जिहाद हवालदार असे या कसायाच्या नाव आहे. खासदार अन्वारुल अझीम यांच्या खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या बंगाल पोलिसांना संशय आहे की, त्यांना हनीट्रॅपच्या बहाण्याने कोलकात्यातील फ्लॅटवर बोलावण्यात आलं होतं. त्या दृष्टिकोनातून तपास देखील केला जात आहे.

पोलिसांनी सांगितलं की, बांगलादेशी खासदार हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं तपासात समोर येत आहे. ही महिला मृत खासदाराच्या मित्राची जवळची मैत्रीण आहे. खासदार अझीम यांना याच महिलेने तिच्या कोलकाता येथील फ्लॅटवर बोलावले होतं. फ्लॅटमध्ये गेल्यानंतर लगेचच त्यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अझीम एका पुरुष आणि महिलेसोबत फ्लॅटमध्ये शिरताना दिसत आहे. ही दोन माणसं नंतर फ्लॅटमधून बाहेर पडताना आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा फ्लॅटमध्ये जाताना दिसली. पण, खासदार एकदाही फ्लॅटमधून बाहेर पडताना दिसले नाहीत.

Lok Sabha Election : उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यातील मतदान

येथे झाला खून !

खासदार अझीम हे 12 मे रोजी दर्शन सीमेवरून कोलकाता येथे गेले होते. पहिल्या दिवशी ते आपला मित्र गोपाळच्या घरी राहिले. दरम्यान, मारेकऱ्याने त्यांना 13 मे रोजी आपल्या फ्लॅटवर बोलावलं. 13 मे रोजी ते संजीबा गार्डनमधील अमानच्या अपार्टमेंटमध्ये गेले होते. दरम्यान, अमानने फैजल, मुस्तफिज, सयाम आणि जिहाद या दोघांच्या मदतीने खासदार अझीम यांना पकडलं. शाहीनचे पैसे परत करण्यासाठी धमकावलं. या वादादरम्यान उशीने तोंड दाबून अझीम यांचा खून केला गेला. शाहीनच्या सांगण्यावरुनच अनवारुल यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जवळच्या शॉपिंग मॉलमधून दोन मोठ्या ट्रॉली बॅग आणि पॉलिथिन पिशव्या खरेदी करण्यात आल्या. त्यात मृतदेहाचे तुकडे भरण्यात आले. हत्येच्या रात्री तुकडे फ्लॅटमध्येच होते. मारेकऱ्यांनी ब्लिचिंग पावडर आणून फ्लॅटमधील रक्ताचे डाग स्वच्छ केले. अमान आणि त्याचे सहकारी ट्रॉली बॅग आणि अनवारुल यांचे बूट घेऊन जात असल्याचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं आहे. ते कोलकाता पोलिसांच्या हाती लागलं आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!