देश / विदेश

North Korea : 30 सरकारी अधिकाऱ्यांना फाशी!

Kim Jong Un : पुरामध्ये नागरिकांचे प्राण वाचविण्यात अपयशी

Kim Jong Un : पुरामध्ये नागरिकांचे प्राण वाचविण्यात आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान रोखण्यात अपयशी ठरलेल्या 30 अधिकाऱ्यांना फाशी देण्यात आली. ही घटना उत्तर कोरियातील आहे. 30 अधिकाऱ्यांना गुपचुप फाशी दिल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जगाला धक्का बसला. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन आणखी एका निर्णय कृतीमुळे चर्चेत आला आहे.

का दिली फाशीवर

किम जोंग उन कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा सहन करू शकत नाही. त्याच्या दहशतीच्या आणि हुकूमशाहीच्या अनेक बातम्या प्रसिद्ध होत असतात. अशातच आता उत्तर कोरियातून धक्कादायक घटना समोर आली आहे. किम जोंग उनने आपल्या देशातील 30 वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट फासावर लटकवले. देशातील काही भागात आलेल्या पुरामुळे हजारो लोकांना प्राण गमवावे लागले. या नागरिकांना पुरापासून वाचवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका 30 अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला. त्याने 30 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली. या घटनेमुळे किम जोंग हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

उत्तर कोरियामधील चागांग प्रांतातील अनेक भागांचे पुरामुळे नुकसान झाले. यात जवळपास चार हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू शकले नाहीत त्या सर्वांना शिक्षा देण्याचे आदेश किम जोंगने दिले. या आदेशांनंतर 30 वरिष्ठ अधिकाऱ्यांना फासावर लटकवण्यात आले. या पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी स्वतः किम जोंगने केली आहे. याचे काही व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते.

काही मिडिया रिपोर्टनुसार लहान मुले, वयस्कर व्यक्ती, दिव्यांग सैनिकांसह 15 हजार 400 लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आलं होतं. उत्तर कोरियाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे. याआधी पुरामुळे मृतांचा आकडा 1000-1500 पेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यावर किम जोंग उन यांनी आक्षेप घेतला होता. मात्र नंतर त्यांनी स्वतः पाहणी केली असता खरी आकडेवारी समोर आली.

MSRTC News : पगार वाढला संप मिटला!

सख्य्या काकांना कुत्र्यांच्या तोंडी

किम जोंग उनच्या सनकीपणाचं हे पहिलं उदाहरण नाही. तो या पद्धतीच्या क्रूर शिक्षेसाठी ओळखला जातो. त्यानं यापूर्वी 67 वर्षांच्या सख्ख्या काकांना (किम जोंग थाएक) 120 उपाशी शिकारी कुत्र्यांच्या पिंजऱ्यात सोडलं होतं. थाएक यांच्या मृत्यूबाबत आवाज उठवणाऱ्या त्यांच्या पत्नीलाही विष देऊन मारण्यात आलं. त्यानंतर त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याचं जाहीर करण्यात आलं. किम जोंग उननं फेब्रुवारी 2015 मध्ये त्याचा सावत्र भाऊ किम जोंग नामची मलेशीयामध्ये हत्या घडवून आणली होती. किम जोंग नामवर उत्तर कोरियाच्या विरोधात हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मलेशियातील विमानतळावर दोन मुलींनी विषारी पिन टोचवून त्यांची हत्या केली होती.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!