Raver Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले. मतदारसंघात एकूण 24 उमेदवार रिंगणात असून प्रत्येकाला वेगवेगळी चिन्हे मिळाली आहेत. 24 उमेदवारांची 24 चिन्हे आहेत. आता ही चिन्हे कशी लक्षात ठेवावीत, असा प्रश्न मतदारांसमोर उभा राहिला आहे.
निवडणुकीच्या प्रक्रियेतील महत्वाचे चिन्ह वाटपा पर्यंतचे टप्पे पार पडल्याने निवडणुकीच्या लढती निश्चित झाल्या. चिन्ह वाटपानंतर अपक्ष उमेदवार प्रचाराला लागले आहेत. निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शुक्रवारी छाननीची प्रक्रिया झाली. त्यानंतर माघारीसाठी चार दिवसांची मुदत देण्यात आली. शनिवार व रविवार सुटीचा दिवस आल्याने सोमवारीच ही प्रक्रिया पार पडली. अपक्ष उमेदवारांना आधीच पसंती क्रमानुसार चिन्ह सुचविले होते. त्यानुसार त्यांना ते मिळाले आहे.
राजकीय पक्षाचा विचार केला तर भाजपाला कमळाचे फूल, राष्ट्रवादीला तुतारी, बहुजन समाज पार्टीला हत्ती असे चिन्हे मिळाले आहे. तर उर्वरित उमेदवारांना आधीच पसंती क्रमानुसार चिन्ह सुचविले होते. त्यानुसारच त्यांना ते चिन्हे मिळाले. 24 उमेदवारांची 24 चिन्हे आहेत. आता ही चिन्हे कशी लक्षात ठेवावीत, असा प्रश्न मतदारांसमोर उभा राहिला आहे.
फुगा, बादली, बॅट, टाचणी आणि बरेच काही…
फळांची टोपली, हॉकी आणि बॉल, कमळ, हत्ती, तुतारी वाजविणारा माणूस, सिलिंडर, गॅस शेगडी, प्रेशर कुकर, संगणक, ऑटो रिक्षा, तुतारी, ट्रक, शिट्टी, ऊस शेतकरी, बॅट, दूरदर्शन, एअर कंडिशनर, कपाट, खाट, पाटी, सफरचंद, बासरी, बेबी वाकर, जहाज, अशी चिन्हे मिळाली आहेत.