Maharashtra Government : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले की केव्हाही विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार, हे सर्वश्रुत आहे. अशात आता नेतेमंडळींचे आपापल्या मतदारसंघातील विकास कामांकडे विशेष लक्ष देणे सुरू आहे. आपल्या राजकीय चातुर्याचा, कौशल्याचा आणि वजनाचा वापर करून नेते मंडळी आपापल्या मतदार संघासाठी निधी खेचून आणण्याच्या प्रयत्नात आहेत. असेच काहीशे चित्र नाशिक विधानसभा मतदार संघासाठी देखील दिसून आले आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पातून येवला मतदारसंघात 23 कोटी 51 लाखांच्या विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये रस्ते व पुलांसह महसूल अधिकारी निवासस्थानाच्या कामांचा समावेश आहे. या कामांना लवकरच सुरुवात होऊन मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.
निधीची मंजुरी
राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून येवला तालुक्यातील प्रमुख राज्य मार्ग 08 ते नांदेसर आडगाव चोथवा उंदीरवाडी बोकटे खामगाव ते प्रमुख राज्य मार्ग 02 रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 80 मध्ये सुधारणा करण्यासाठी 2 कोटी 50 लाख, अनकाई कुसमाडी नगरसूल अंदरसूल पिंपळगाव जलाल रोड राज्य महामार्ग 451 या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 5 कोटी रुपये निधीस मंजुरी मिळाली आहे.
त्याचबरोबर निफाड तालुक्यातील लासलगाव येथील लासलगाव पाटोदा रस्त्यावरील राज्य महामार्ग 14 वरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी 4 कोटी 50 लाख, गाजरवाडी ते नांदूरमध्यमेश्वर ग्रामीण महामार्ग 123 या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी 2 कोटी, वनसगाव थेटाळे कोटमगाव प्रमुख जिल्हा मार्ग 174 या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे व सुधारणा करण्यासाठी 3 कोटी निधीस मंजुरी मिळाली आहे.
येवला ला 6 कोटी 51 लाख
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला येथील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुसज्ज असे निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
Maharashtra Assembly : ‘आरक्षण प्रश्न सोडविता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा’
प्रयत्नांतून पुन्हा महसुली अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी 6 कोटी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या निवासस्थानांच्या कामास सुरुवात होऊन महसुली अधिकाऱ्यांना सुसज्ज असे निवासस्थान उपलब्ध होणार आहे.