महाराष्ट्र

Assembly Election : राज्यातील 23 उमेदवारांचे मतमोजणीवर आक्षेप

Voting : आश्चर्यकारक निकाल आणि मतदानाच्या टक्केवारीवर संशय

EVM voting : महाराष्ट्रात निवडणूक निकालादरम्यान अनेक ठिकाणी समान निकाल दिसून आले. विशेष म्हणजे, संध्याकाळी सहा वाजल्यानंतर अचानक मतदानाची टक्केवारी वाढल्याची नोंद झाली. त्यामुळे विरोधी पक्षांनी आश्चर्य व्यक्त केले. यामुळे मतमोजणी प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. निवडणूक आयोगाने या विषयावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांना बोलावले असले तरी, 23 उमेदवारांनी आक्षेप घेतल्यामुळे आयोगाचं टेन्शन वाढला आहे.

मतमोजणीवर आक्षेप घेत हरकत अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि दिग्गज नेते आहेत. यामध्ये बारामतीचे शरद पवार गटाचे युगेंद्र पवार, संगमनेरचे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पुणे कॅन्टोनमेंटचे रमेश बागवे, कर्जत-जामखेडचे भाजपचे राम शिंदे, अभिषेक कळमकर, पारनेरच्या राणी लंके, राहुरीचे प्राजक्त तनपुरे, कोपरगावचे संदीप वरपे, हडपसरचे प्रशांत जगताप, शिरूरचे अशोक पवार आणि ठाणे शहराचे राजन विचारे यांचा समावेश आहे. या उमेदवारांनी निकालावरील शंका व्यक्त करत निवडणूक आयोगाकडे पडताळणीची मागणी केली आहे.

बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे. प्रक्रियेत पारदर्शकता न राहिल्यामुळे मतमोजणी संशयास्पद ठरली आहे. माझ्यासह अनेक उमेदवारांच्या मते पडताळणी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे युगेंद्र पवार म्हणाले.

Solapur : या गावात आज बॅलेट पेपरवर मतदान

मतमोजणीचा निर्णय अद्याप नाही 

निवडणूक आयोगाने या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी वेळ दिली असली तरी, पुन्हा मतमोजणी करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. जर मतमोजणी प्रक्रिया पुन्हा राबवली गेली, तर हा महाराष्ट्राच्या निवडणूक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

हरकत अर्ज दाखल करणारे उमेदवार –

युगेंद्र पवार – बारामती (शरद पवार गट)

बाळासाहेब थोरात – संगमनेर (काँग्रेस)

रमेश बागवे – पुणे कॅन्टोनमेंट

राम शिंदे – कर्जत-जामखेड (भाजप)

अभिषेक कळमकर – नगर शहर

राणी लंके – पारनेर (राष्ट्रवादी शरद पवार गट)

प्राजक्त तनपुरे – राहुरी (राष्ट्रवादी शरद पवार गट)

संदीप वरपे – कोपरगाव

सुनील भुसारा – विक्रमगड

प्रशांत जगताप – हडपसर

अशोक पवार – शिरूर

सचिन दोडके – खडकवासला

राहुल कलाटे – चिंचवड

चरण वाघमारे – तुमसर (पवार गट)

फवाद अहमद – अणुशक्तीनगर

केदार दिघे – कोपरी-पाचपाखाडी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

राजन विचारे – ठाणे शहर

नरेश मणेरा – ओवळा-माजिवडा

दीपेश म्हात्रे – डोंबिवली

एम. के. मडवी – ऐरोली

हितेंद्र ठाकूर – वसई (बविआ)

क्षितीज ठाकूर – नालासोपारा

राजेश पाटील – बोईसर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!