महाराष्ट्र

Lok Sabha Election : 21 उमेदवार आजमावणार भाग्य !

Buldhana Constituency : चर्चेतील अपक्षांना मिळाले फोटो कॅमेरा आणि पाना चिन्हं

Buldhana constituency : बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 29 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल होते. यात चार उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आल्याने 25 उमेदवार कायम होते. तर अर्ज मागे घेण्यासाठी 8 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. यामध्ये काल दुपारी तीन वाजेपर्यंत 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणामध्ये 21 उमेदवार उरले आहेत. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये भाजपचे विजयराज शिंदे आणि काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वरदादा पाटील या दोन दिग्गजांचा समावेश आहे. त्यानंतर लगेचच अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. यामध्ये रविकांत तुपकर यांना “पाना” तर संदीप शेळके यांना फोटो कॅमेरा हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने ०८ एप्रिल रोजी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. चिन्ह वाटप करतांना अधिकृत पक्षांना प्राधान्य दिले जाते व त्यानंतर अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाते. रविकांत तुपकर हे अपक्ष उमेदवार असून त्यांना पाना हे चिन्ह देण्यात आले आहे. आता जिल्हाभर हा पाना फिरणार आहे. दुसरीकडे चर्चेतील उम्मेदवार संदीप शेळके यांना फोटो कॅमेरा हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. वंचित बहुजन आघाडी समर्थीत उमेदवार वसंत मगर यांना रोड रोलर हे चिन्ह जिल्हा निवडणूक विभागाकडून मिळाले आहे. प्रतापराव जाधव यांना शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण तर महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना उबाठा गटाचे मशाल हे निवडणूक चिन्ह आधीच मिळाले आहे. आज ०९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन रविकांत तुपकर प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. यावेळी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.

आता सर्वांनाच निवडणूक चिन्ह मिळाल्याने पुन्हा एकदा धुमधडाक्यात प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागलेले दिसत आहेत.

हे आहेत उमेदवार रिंगणात –

प्रतापराव गणपतराव जाधव – शिवसेना, नरेंद्र दगडू खेडेकर – शिवसेवा उबाठा, सुमन मधुकर तिरपुडे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक, असलम शहा हसन शहा – महाराष्ट्र विकास आघाडी, वसंत राजाराम मगर – वंचित बहुजन आघाडी, महंमद हसन इनामदार – मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टी, प्रताप पंढरीनाथ पाटील – बहुजन मुक्ती पक्ष, मच्छिंद्र शेषराव मघाडे – सोशालिस्ट पार्टी इंडिया, माधवराव सखाराम बनसोडे – बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, संतोष भीमराव इंगळे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर, गौतम किसनराव मघाडे – बसपा,

रविकांत चंद्रदास तुपकर – अपक्ष, संदीप रामराव शेळके – अपक्ष, गजानन जर्नादन धांडे – अपक्ष,

नंदू जगन्नाथ लवंगे – अपक्ष, उद्धव ओंकार आटोळे – अपक्ष, अशोक वामन हिवाळे – अपक्ष, रेखा कैलास पोफळकर – अपक्ष, विकास प्रकाश नांदवे – अपक्ष,

बाळासाहेब रामचंद्र इंगळे – अपक्ष, दिनकर तुकाराम संबारे – अपक्ष.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!