महाराष्ट्र

Gram panchayat : सरपंचपद आरक्षणासाठी उजाडणार डिसेंबर 2025

Election News : तुमसर मधील 18 गट ग्राम पंचायतीसाठी निघणार अधिसूचना

Bhandara District तुमसर तालुक्यातील 18 गट ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबर 2025 मध्ये संपणार आहे. परंतु सरपंचपदाचे आरक्षण डिसेंबर 2025 मध्ये निघणार असल्याने तो पर्यंत वाट पाहावी लागेल.थेट सरपंचपदाची निवड होणार नाही. त्यामुळे सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्यात येत आहे. सोबतच 79 ग्रामपंचायतचे आरक्षण घोषित करण्यात येत आहे. ही संधी गट ग्रामपंचायतला प्राप्त होत नाही. गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्याची मागणी होत आहे.

का सरपंचपदाचे आरक्षण काढले जात आहे?

तुमसर तालुक्यात 97 ग्रामपंचायती आहेत.18 गट ग्रामपंचायतीची निवडणूक जानेवारी महिन्यात घेतल्या जात आहेत. जानेवारी 2021 मध्ये गट ग्रामपंचायतच्या निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत. डिसेंबर 2025 मध्ये गट ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना निघणार आहे. 89 ग्रामपंचायतींना थेट सरपंचपदाची दोनदा संधी मिळाली. परंतु गट ग्रामपंचायतींना एकदाही संधी मिळाली नाही. सरपंचपदाचे आरक्षण काढताना तालुक्यातील 97 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण काढले जात आहे.

EVM Security : ‘स्ट्राँग रुम’च्या सुरक्षेमुळे ‘परिंदा भी पर नहीं मारता’

आरक्षण आधीच घोषित व्हावे

दोन वर्षांच्या आधीच आरक्षण घोषित करण्याची संधी गट ग्रामपंचायतींना प्राप्त झाली पाहिजे. परंतु या दिशेने निर्णय घेतले जात नसल्याने गट ग्रामपंचायतीत असणाऱ्या गावात नाराजीचा सूर आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचा फटका गट ग्रामपंचायतला बसला आहे. गावात थेट निवड प्रक्रियेची संधी गट ग्रामपंचायतला मिळणार असल्याने सरपंचपदाचे आरक्षण घोषित करण्याची मागणी गावातून होत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!